न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- इन्स्टाग्राम आयडीवर दुस-याच एका पीएसआयचा फोटो वापरला. व्हॉट्सअपद्वारे कॉल करुन फिर्यादीला पीएसआय असल्याची बतावणी केली. फिर्यादीशी ओळख वाढवुन फिर्यादीबरोबर लग्न करायचे असल्याचे सांगुन फिर्यादीचे फोटो प्राप्त केले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडुन वेळोवेळी फोन पे द्वारे ८,८०० रुपये फिर्यादीला ब्लॅकमेल करुन घेतले.
आणखी पैशांची मागणी करीत असल्याने फिर्यादीने त्यास नकार दिल्याचे पाहुन फिर्यादीला वारंवार फोनवरुन, व्हॉट्सपवरुन लग्नाची, सेक्सची मागणी व पैशांची मागणी करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि.०४/०१/२०२४) ते दि ०१/०३/२०२४ पर्यंत वाकड येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी शुभम राठोड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी २४५/२०२४ भा. द. वि. कलम ३५४ डी, ३८४, ३८५, १७०, ५०६ आयटी अॅक्ट ६६ सी नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पवार पुढील तपास करीत आहेत.













