न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- शाहूनगर, चिंचवड येथील शिवमंदिर प्रांगणात मंगळवार (दि. ०५) ते शनिवार (दि. ०९) या कालावधीत पाच दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी – चिंचवड प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कामगार आयुक्त पुणे अभय गीते, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानमाला आणि महाशिवरात्र महोत्सवासाठी शिवशंभो फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी राजेश हजारे, संजय देशमुख, दत्तात्रय भुसे, काळुराम साकोरे, विद्याधर राणे, विकास शेवाळे, खंडू बारवकर, विठ्ठल मुसळे, कैलास पोखरकर, शर्मा अंकल, रघुवीरसिंग नाना गिरण, राजेंद्र पवार, योगेश हजारे तसेच राणेकाकू, आश्र्विनी महांवर , सविता बारवकर, ज्योती भुसे, नलिनी इंगलकर, रूपाली तोरखडे, सीमा साकोरे, रेणुका हजारे, अरुणा घोळवे, उज्ज्वला शेवाळे, शशिकला देशमुख, विद्या राणे, वंदना गांगुर्डे, दीपाली भोईटे यांनी परिश्रम घेतले आणि नियोजन केले आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांनी केले आहे.











