- तब्बल अडीच तासांच्या बैठकीनंतर सल्लागार व ठेकेदारांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन १८ मजली पर्यावरणपूरक इमारत चिंचवड येथील सायन्स पार्कसमोर उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. त्या इमारतीमध्ये अधिकारी, पदाधिकारी व विविध विभागांची दालने व कार्यालय कोठे असणार त्यावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्याबाबत नुकताच सुमारे अडीच तास खल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन इमारत सायन्स पार्कसमोरील ८.६५ एकर जागेत उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी २८६ कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. हैदराबादच्या केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदार कंपनीस १३ जानेवारी २०२३ ला वर्कऑर्डर देण्यात आलो आहे. या ठिकाणी १८ मजली इमारतीचे दोन विंग आणि ६ मजली इमारीचे दोन विंग असणार आहेत. एकूण १९ हजार ४५९ बौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असणार आहे सभागृहाची क्षमता ४५० लोक बसतील इतकी असणार आहे. इमारतीमध्ये विविध सोई-सुविधा असणार आहेत. कामाची मुदत तीन वर्षे आहे. या इमारतीमध्ये अधिकारी, पदाधिकारी व विविध विभागांचे कार्यालये व दालने कोणत्या मजल्यावर असतील या संदर्भात चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यात सर्व विभागप्रमुखांकडू त्या विभागाची एकूण कर्मचारी आणि कार्यालयासाठी आवश्यक जागेची मागणी नोंदविण्यात आल. इमारतीच्या सर्वांत उंच अठराव्या मजल्यावर आयुक्तांचे प्रशस्त दालन आणि मिटींग हॉल असणार आहे. तसेच, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त या वरिष्ठ अधिका-यांची स्वतंत्र दालने असणार आहेत.
नागरिकांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेले विभाग पहिल्या, दुसऱ्या, तिस-या मजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सल्लागार व ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत सुचनांनुसार इमारतीमध्ये रचना, आकारमान व इतर सोई-सुविधांबाबत सूचना करण्यात आल्या. तब्बल अडीच तास ही बैठक चालली होती.













