न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :-पिंपळे सौदागर येथील शिवसाई लेन रस्त्यावरील लोटस हॅास्पीटल समोरील महावितरणाच्या फिडर बॉक्सला आज (दि. ५) रोजी सकाळी ७.०० वाजता अचानक आग लागली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत महावितरण आणि नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आगीची माहिती दिली. नाना काटे यांनी महावितरणचे अभियंता ननवरे यांना फोन करून या फिडर बाँक्सवरील विद्युतप्रवाह बंद करण्यास सांगितला.
अग्निशामक विभागाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली.













