- साडेसहा लाखांच्या मुद्देमालासह चार गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- बाळाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी भांडी लागतात, असे खोटे सांगून पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण परिसरातील वेगवेगळ्या मंगल केंद्र मालकांचा विश्वास संपादन करून भांडी परत न करता त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिघी पोलीसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून एकूण ६,४०,७८० रू कि. चा माल जप्त करून एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अक्षदा मंगल केंद्र, आदर्शनगर, दिघी येथील मंगल केंद्र मालकाच्या दुकानातील ३९,७८० रू. कि. ची वेगवेगळी भांडी विनोद सुर्यवंशी नावाचा इसम व त्याचे सोबत असणारे तीन इसम व एक महिला यांनी बाळाच्या वाढदिवसाचे कार्यक्रमासाठी भांडी लागतात असे खोटे सांगून केंद्र मालकांचा विश्वास संपादन केला. भांडी घेवून जावून टी परत केली नव्हती. त्यावर अक्षदा मंगल केंद्र मालक नमूद इसमांचा शोध घेत होते. त्यांना भोसरी, देहूरोड, चिखली या मंगल केंद्र मालकांकडून माहिती मिळाली की, विनोद सूर्यवंशी नावाच्या इसमाने व सोबतच्या टोळीने अशाच प्रकारे अनेक मंगल केंद्र मालक यांची फसवणूक केली आहे.
याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अक्षदा मंगल केंद्र मालक व इतर मंगल केंद्र मालक यांच्या मदतीने आरोपींचा शोध घेवून आरोपी १) विनोद लक्ष्मण सुर्यवंशी ऊर्फ चैतन्य पाडुरंग चौधर, (वय २१ वर्षे, रा. निपानी जळगांव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), २) तुळशीराम निवृत्ती फुंडे (वय ६४ वर्षे, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदगनर) ३) अनिषा देविदास फुंडे (वय २५ वर्षे, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदगनर) यांना (दि. ३) रोजी अटक केली.
अटक आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेनंतर त्यांचेकडून एकूण ६,४०,७८० रू कि. ची वेगवेगळी भांडी तसेच दोन मोबाईल तसेच एक फोरव्हिलर कार व दुव्हिलर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच तपासात अटक आरोपीची टोळी असून त्यांनी आपले पाहिजे साथीदारांसह इतर मंगल केंद्र मालकांची सुध्दा अशाच प्रकारे फसवणूक केलेबाबत उघडकीस आले. याबाबत सदस्थितीत १) खेड पोस्टे पुणे ग्रामीण गु.र.नं. १४७/२०२४, भादवि क. ४२०,४०६,४१९,३४ २) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.र.नं. १२४/२०२४, भादवि क. ४०६,४२० ३) शिरुर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गु.र.नं. १९५/२०२४, भादवि क. ४२०,४०६,३४ ४) देहूरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.र.नं. १००/२०२४, भादवि क. ४२०,४१९,४०६,३४ अन्वये गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. गुन्हयाचा तपास चालू असून उर्वरीत फरार आरोपींचा शोध चालू आहे.
ही कारवाई पोलीस उप-अयुक्त सो, परीमंडळ ०३. डॉ. शिवाजी पवार, तसेच सहा पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, राजेंद्रसिह गौर वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील व सहा. पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, पोलीस हवा १०२० कांबळे, पोशि २८२८ काकडे, पोशि ३५५३ कसबे तसेच पोशि ३०६३ खळसोडे, मपोशि ३७७२ गोरड व पोहवा राजू जाधव नेमणुक परिमंडळ-०३, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.
अशा प्रकारे मंगल केंद्र मालकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे संपर्क करावा. (दिघी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड फोन नं. ०२०-२९९५०४४७ )