- ब्रँड नेम नव्हे तर, कंटेंट नेम नुसार निविदा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- सुरहिद केमिकल्स मुंबई आणि युनि लॅब मुंबई या संस्थांनाच पाच वर्ष झाले काम दिले जात होते. त्या विरोधात चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड सचिव रुपेश पटेकर यांनी आयुक्तांकडे केली होती. यावर आयुक्ताने हिरवी झेंडी दाखवत ब्रँड नेम नव्हे तर कंटेंट नेम नुसार निविदा काढली आहे.
साविस्तर माहिती अशी की, सलग गेली पाच वर्षे एकाच ठेकेदाराला सुरहिद केमिकल्स मुंबई आणि युनि लॅब मुंबई यांच्या मार्फत पुरवठा केला जाणारे जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशक अनुक्रमे स्टेरी ए एफ एम आणि बँक्तोडेक्स या दोन्ही मालासाठी प्रस्तावित निविदा पुरवठा आदेश अथवा थेट खरेदी पद्धतीने देण्यात येत होत्या. मनसेचे रुपेश पटेकर यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी आयुक्तांना पत्राद्वारे निविदाची मागील पाच वर्षांची माहिती देण्यात यावी. महागडे प्रॉडक्ट खरेदी करताना स्वस्त असे प्रोडक्ट उपलब्ध आहेत का याबाबत महानगरपालिकेने काही ठोस पावले उचलली का? तसेच गेल्या पाच वर्षामध्ये महापालिकेला दोन्ही व्यतिरिक्त इतर ऑप्शन्स का प्राप्त होऊ शकले नाहीत. दोन्ही संस्थांची सूत्र हलवणारा आणि महानगरपालिकेमध्ये येऊन वाटाघाटी करणारा सुरहिद केमिकल्सचा एकच माणूस महानगरपालिकेत कसा आढळतो अशी माहिती विचारली होती.
तसेच वस्तुनिष्ठ परिस्थितीचा विचार करता आरोग्य विभाग तसेच मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या कामकाजा संदर्भात शंका निर्माण होते असून आपल्या स्तरावर सदर प्रकरणाबाबत मागील पाच वर्षाची माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत योग्य ती कारवाई करावी. दोन्ही संस्थांचे राबविण्यात आलेती चालू निविदा किंवा त्यांचे बाकी देयक यांना सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती देण्यात येण्याची मागणी कऱण्यात आली होती.
पटेकर यांनी सर्व वास्तूनिष्ट परिस्थिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे आयुक्त यांनी २१/२/२०२४ च्या प्रस्तावानुसार सन २०२१ पासून स्टेरी ए एफ एम व बँक्तोडेक्स खरेदिकामी ब्रँड नेम नव्हे तर कंटेंट नेम नुसार निविदा काढली आहे. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.


















