न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- ‘अब की बार ४०० पार’, अशी घोषणा देत भाजपने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी प्रचारासाठी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र, भाजपच्या बालेकिल्ल्यात केशवनगर, चिंचवड येथे एका ठिकाणी भाजपच्या जाहिरातीला काळे फासण्यात आले आहे. तर अन्य एका ठिकाणी भाजपच्या चिन्हावर महापुरूषाचा फोटो लावून चिन्ह झाकण्यात आले आहे.
केशवनगर, चिंचवड येथील गणेश विसर्जन घाटाजवळ एका सोसायटीच्या भिंतीवर पक्षाचे चिन्ह असलेला मजकूर रंगविण्यात आला आहे. मात्र कोणीतरी या जाहिरातीवर काळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे.
तसेच केशवनगर, चिंचवड येथील गोयल गरीमा या सोसायटी बाहेर रंगविण्यात आलेल्या भाजपच्या जाहिरातीवरील चिन्हावर महापुरुषाचा फोटो लावण्यात आला आहे. या कृत्यांमुळे भाजपच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.











