न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२४) :- रेकिट बेंकीझर कंपनीचे बनावट हार्पिक, लाईजॉल, कॉलीन, रिन आला व गोदरेज कंपनीचे गुड नाईट बनावट लिक्वीड तयार करून विक्री करणारी टोळी पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केली असून भोसरी एमआयडीसी व ठाणे शहर परिसरातून १५,१५,६७८ रूपयांचा बनावट मुददेमाल व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी (दि. १०) रोजी कॉपीराईट अधिकारी यांनी तक्रार दिली होती.
१) भावेश लक्ष्मण पटेल (वय ५८ वर्षे रा. तोरनिया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात, सध्या रा. इंद्रायणीनगर, भोसरी), २) अन्वर भचुभाई खलिफा (वय ३० वर्षे रा. पोस्ट लाकडीया ता. बच्चाऊ जि. कच्छ राज्य गुजरात, सध्या रा. इंद्रायणीनगर भोसरी), ३) मंजी हरि भासडीया (वय ४१ वर्षे रा. कामोठा) यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान त्यांच्याकडून हाई टेक शॉट ब्लास्ट, इंद्रायणीनगर, भोसरी येथील गोडावूनमधून २,२२,४५६ रू चा रेकिट बेंकीझर या कंपनीचे हार्पिक, लाईजॉल, कॉलीन व गुड नाईट या मुळ कंपनीच्या मालाशी साध्यर्म्य असलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. यातील आरोपी भावेश याच्या मार्फत निष्पन्न आरोपी मंजी हरि भासडीया (वय ४१ वर्षे रा. कामोठा) याला ताब्यात घेवून चौकशी केली. ठाणे येथे एक गोडाऊन वजा कंपनीमध्ये त्याने या गुन्हयातील बनावट हार्पिक व इतर कंपन्याचा कि.रू १२,९३,२२२/- चा बनावट मुददेमाल तयार केला असून तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, सहा पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर यांनी केली आहे.













