न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२४) :- फ्रिजवर चढुन चहाचे कप काढत असताना फ्रिजच्या बाहेरील बॉडीचा इलेक्ट्रीक करंट बसुन सतरा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मुत्यु झाला आहे. दुकान मालकाला फ्रिजच्या बाहेरील बॉडीला इलेक्ट्रीक करंट येत असल्याचे माहित असताना देखील त्याकडे त्याने हेतुपरस्कृत दुर्लक्ष केले.
फिर्यादीचा मुलगा तसेच इतर कामगार यांनी आरोपी मालकाला वेळोवेळी सांगुन देखील फ्रिज दुरुस्ती न केला नाही. कामगारांच्या सुरक्षीततेबाबत उपाय योजना न करता हयगयीने फ्रिज दुकानामध्ये ठेवला. फिर्यादीच्या मुलाच्या मृत्यूस आरोपी कारणीभुत झाला आहे. फिर्यादीचा मुलगा हा अल्पवयीन असल्याचे माहीती असताना देखील त्याला स्वतःच्या चहाच्या दुकानात कामावर ठेवुन घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास येवले चहाचे दुकान, सोनीगरा हाईट बिल्डींग, तळवडे येथे घडला. फिर्यादी प्रेमकुमार सिध्दाराम बनसोडे यांनी आरोपी गणेश जगताप (पुर्ण नांव पत्ता माहीती नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी १३६/२०२४, भादंवि कलम ३०४ (ii), बाल कामगार सुधारीत अधिनियम २०१६ चे कलम १४(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि खारगे तपास करीत आहेत.













