न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून 60 हजारांपेक्षा जास्त मतांचे लीड देण्याचा निर्धार भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केला. भाजपच्या पिंपरी विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात पुन्हा एकदा या देशात नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार येणार, असा ठाम विश्वास दर्शविला आहे.
अबकी बार 400 पार, फिर एक बार, मोदी सरकार… !!! हा नारा भाजपने दिला आहे. पिंपरी विधानसभेत बूथ प्रमुख व सुपर वॉरिअर्स यांची बैठक मोहननगरमधील शिव पार्वती सभागृह येथे पार पडली. या बैठकीला संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्य्क्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी विधानसभेत एकुण 399 बूथ प्रमुख व 153 सुपर वॉरियर अशा मोठ्या संख्येने या बैठकीला पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक बूथ प्रमुखाला तसेच सुपर वॉरिअर्स ला आपापल्या कामाची जबाबदारी काय आहे हे मकरंद देशपांडे यांनी समजून सांगितले. यावेळी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला पंतप्रधान म्हणून का हवे..? तसेच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार काय यावे..? यासाठी जनमानसात आपण संपर्क करायचा आहे, तसेच मोदी यांनी दहा वर्षात देशाचा जो मान सन्मान या संपूर्ण जगात वाढवलेला आहे. त्याची ही माहिती बूथ प्रमुखांच्या मदतीने सर्व मतदारांच्या पोहचवायची आहे.
शंकर जगताप यांनी आपकी बार 400 पार चा नारा दिला. तर, आमदार खापरे यांनी बूथ सक्षमीकरण का महत्वाचे आहे याविषयी सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून महेश कुलकर्णी व मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती झाल्याने विशेष सत्कार करण्यात करण्यात आला.
संतोष कलाटे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस संजय मंगोडेकर,माजी नगरसेवक शीतल शिंदे, उपाध्यक्ष माऊली थोरात, मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक सागर फुगे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, पिंपरी विधानसभा विस्तारक नंदू कदम, पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, चिंचवड स्टेशन प्राधिकरण मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, गणेश लंगोटे, कैलास कुटे, वैशाली खाडे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार मनिषा शिंदे यांनी मानले. या बैठकीचे नियोजन पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर व निलेश अष्टेकर यांनी केले.











