न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२४) :- ‘कोणतेही कर्ज थकविलेले नसताना ते भरत नाहीत, ते बुडवे आहेत, अशी आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या भावाची बदनामी केली. ही बाब फिर्यादी यांना त्यांच्या नातेवाईकांकडून समजल्यानंतर फिर्यादीचा मोठा भाऊ याने मोबाईलवरून फोन करुन कोणते कर्ज आहे, कोणत्या बँकेचे कर्ज आहे? असे आरोपींना विचारले. त्यांनी कोणतीही बँक सांगीतली नाही, कोणतीही माहिती दिली नाही.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन “मी मायकल बोलत आहे, तु आता मोठ्या घरामध्ये राहत आहेस, मी तुझे नातेवाईक शोधुन त्यांना फोन केले आहेत. तु मला दिनांक २०/०३/२०२४ रोजीपर्यंत ०५ लाख रुपये दे, नाहीतर मी तुझे फोटो एडिट व अश्लिल करुन ते फेसबुक, इन्सटाग्राम व सर्व नातेवाईकांना पाठवुन देईल’ अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०६) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी आळंदी येथे घडला. महीला फिर्यादी यांनी आरोपी मोबाईल नंबर वापरकर्ता मनु स्वामी रोजारिओ ऊर्फ मायफल याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी ११४/२०२४ भा.द.वि. कलम ३८५,५०० ३४ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रणवरे पुढील तपास करीत आहेत.











