न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- कर्ज काढून देण्याच्या कारणावरून मयत इसमाची सात जणांनी फसवणूक केली. फलॅट नावावर करून घेवून व व्याजाच्या पैशापोटी सतत तगादा लावून, शिवीगाळी, दमदाटी करून शारीरीक व मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे पती राजेद्र किसन कदम (वय ५० वर्षे) यांनी ब्रटनिल नावाचे किडे मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केली.
आरोपी क्र १ ते ७ यांनी फिर्यादी यांच्या पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार २०१४ ते दि. १२/०३/२०२४ पर्यंत, रामेश्वर सोसायटी, शाहूनगर, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी १) राजू शंकर राणे (रा. निगडी प्राधिकरण), २) संजय शेलार (पुर्ण नाव माहिती नाही रा.चिंचवड स्टेशन), ३) शाम तेलगू (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), ५) शाम हुज्जी (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), ४) रमेश औताडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), ६) संतोष गयाकवाड (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), ७) च-हाटे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी १५४/२०२४, भा.द.वि.क. ३०६,४२०, ४०६,५०४, ५०६,३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मोरे तपास करत आहेत.














