न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी उजगरे टोळी, आहिरराव टोळी या टोळयांवर “मोका अंतर्गत कारवाई ” करण्यात आली आहे. २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०६ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३० आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
१) भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं १७/२०२४ भादवि कलम ३९४,३४, आर्म अॅक्ट ४(२५) क्रि. लॉ. अॅगे. अॅक्ट कलम ३च ७ महा. पो. कायदा कलम ३७ (१)१३५ या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी नामे १) पवन छगन उजगरे (टोळी प्रमुख) रा.भोसरी पुणे २) सुनिल जनार्दन सकट, वय ३२ वर्षे, रा. विठ्ठल नयर, अण्णाभाऊ साठे कमानीच्या आत, लांडेवाडी, भोसरी पुणे ३) दिपक रामकिसन हजारे, वय २७ वर्षे, रा. वय २७ वर्षे, रा. विठ्ठल नगर, अण्णाभाऊ साठे कमानीच्या जवळ, लांडेवाडी, भोसरी पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०६ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
२) वाकड पोलीस स्टेशन, गु.रजि. नं. १९४/२०२४ भादवि. ३०८, ३२३, ५०६, ३४. आर्थ अॅक्ट ४(२५), महा.पो.का. क. ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी नामे १) आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (टोळी प्रमुख) वय ३१ वर्षे, रा. भक्ती कॉम्लेक्स समोर, संस्कृती निवास, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे २) प्रतिक अशोक माने, वय २० वर्षे, रा. हवेली कॉम्प्लेक्स, श्रीनगर, थेरगाव, पुणे ३) प्रेम संदीप तरडे, वय १९ वर्षे, रा. लक्ष्मीदीप सोसायटी, बीर हॉस्पीटल समोर, काळेवाडी पुणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १० गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
वरील दोन्ही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक वः काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किवा संघटनेच्या वतीने एकटयाने किवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किवा धाक दपटशहा दाखवून टोळी प्रमुख व साथीदार यांनी भोसरी, वाकड़, सांगवी, चतुश्रृंगी, सोलापुर, अहमदनगर पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दुखापत, दंगा, मारामारी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यारे / अग्निशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात वहशत रहावी हाच उद्देश ठेवून टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आधिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद गुन्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.














