न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- आयटी पार्कमध्ये काम करणारे तरुण, तरुणी, उद्योगनगरीमध्ये झपाट्याने होणा-या विकासकामांमध्ये काम करणारा कामगार वर्ग, शिक्षण घेणारे तरुण, तरुणी यांच्यावरील कामाचा, शिक्षणाच्या बोजामुळे तसेच झोपडपट्टी परिसरातील मजुरी करणारे व्यसनाकडे कडुन अंमली पदार्थाचे विळख्यामध्ये पडु नयेत करीता जनजागृती करणे व कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा बसावा या उद्देशाने शहरात कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान सांगवी येथे गांजा, चरस व एल.एस.बी.डॉट पेपर विक्री करणा-या ०५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन एकुण २०,८९,५०० रु. किं. चे ०७ किलो २०० ग्रॅम गांजा व १७५ ग्रॅम चरस जप्त करुन गांजा, चरस व एल.एस.डी. डॉट पेपर विक्री करणारे रॅकेट उध्दवस्त केले. (दि. १७) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावुन सांगवी स्मशानभूमीच्या विरुध्द असलेल्या एस टी कॉलनीच्या कोप-यामध्ये आडोशाला पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले.
१. ओंकार ऊर्फ सोन्या महादेव लिंगे (वय २६ वर्ष रा. दापोडी), अनिकेत अनिल गोडांबे (दापोडी), ३. रोहन उत्तम कांबळे (वय २१ वर्षे, दापोडी), ४. रुपेश गौतम जाधव (२१ वर्ष, दापोडी), ५. रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (२४ वर्ष, दापोडी) असे अटक आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून एकूण २०,८९.५००/- रु. किं चा माल ज्यामध्ये १) ३.६०,०००/- किमतीचा ७ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ २) ४३०५००/- किमतीचे १७५ ग्राम चरस, ३) १,८०,०००/- १२ एल.एस.डी. डॉट पेपर, ०६ मोबाईल, ०१ मारुती सुझुकी स्विफ्ट कार, ०२ अॅक्टीवा, ०१ स्पा अश्या चाकी व दुचाकी गाड्या जप्त करून त्यांच्यावर सांगवी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii)(ब) २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














