न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२४) :- जुन्या वादातून हॉटेल चालकाला दोघांनी धक्का दिला. त्यावेळी हॉटेलच्या दरवाजाजवळ असणारा एकजण हा आतमध्ये धावत आला. त्याच्या हातामध्ये असणा-या पिस्टलने फिर्यादीवर एक गोळी झाडली. ती फिर्यादीच्या डोक्याला वरच्या बाजूस चाटून गेली. फिर्यादी जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या मुख्य दरवाजातून बाहेर पळत सुटले. त्यावेळेस आरोपी हे ‘मादरचोद, तूला आता सोडत नाही. तूला मारून टाकणार’ असे बोलत फिर्यादीच्या पाठीमागे धावू लागले. जीव वाचवत हॉटेलच्या डावीकडे वळून एका घरामध्ये धावत गेले आणि दरवाजाला फिर्यादीने आतून कडी लावली.
आरोपी त्या ठिकाणी आले व दरवाजावर शिव्या देत लाथा मारल्या. फिर्यादीने दरवाजा उघडला नाही. घराबाहेर गर्दी जमल्यामुळे आरोपी पळुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. १८) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास रासे फाटा, मराठा हॉटेल, ता. खेड जि.पुणे येथे घडला.
फिर्यादी स्वप्निल संजय शिंदे (वय ३२ वर्षे, धंदा हॉटेल) यांनी आरोपी १) अजय अरुण गायकवाड (वय २४ वर्षे, रा भोसले वस्ती, महाळुंगे इंगळे ता खेड), २) राहूल पवार, ३) एक अज्ञात इसम (पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलिसांनी १९२/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,५०४, ५०६,३४ भा.ह.का ३ (२५), म.पो.अ. ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करीत एकाला ताब्यात घेतले आहे.













