न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२४) :- कस्टमरला फ्लॅट दाखवण्यासाठी फिर्यादीचे पती गेले होते. सबंधित ठिकाणी काम चालु असताना कोणत्याही कामगारांच्या तसेच व्हिझीटर लोकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना आरोपींनी केल्या नव्हत्या. त्यांच्या निष्काळजीपणामुळे फिर्यादीचे पती हे सहाव्या माळयावरील लिफट डक्टमध्ये पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युस आरोपी कारणीभुत झाले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२३/१२/२३) निसर्ग बेलीरोन सोसायटी, गोल्डन केअर हॉस्पिटल जवळ, वाकड येथे घडला आहे. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) गुंडू कसनु पवार (वय ४० वर्ष, रा. भुमकर वस्ती, हिंजवडी), २) अभिषेक अभय देवने (वय २६ वर्ष, रा. वाकड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ३३०/२०२४ भादवि कलम ३०४ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.













