न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२४) :- ‘गाडीवर तुझं कुत्र लघवी करत आहे, दिसत नाही का?’ असं कुत्र्याच्या मालकास म्हटल्याचा राग आल्याने कुत्र्याच्या गळयातील चैनीच्या लोखंडी हुकच्या पटट्याने तरुणाला बेदम मारहाण केली.
डोक्यात जोरात प्रहार करुन त्याना जखमी केलं. आरोपीच्या आईने तरुणाला शिवीगाळ करुन धमकी दिली. पिक अपची वाट पाहत गाडीत असताना गुरुवारी (दि २१) रोजी सकाळी नऊ वाजता चिंचवड, यशोपुरम कॉर्नर, लिंक रोड, इगल हॉटेलसमोर, चिंचवड येथे हा प्रकार घडला.
फिर्यादी अतुल गुलाब लोंढे (वय ३६ वर्षे, रा. वाकड) यांनी धनंजय कालीदास यादव व त्याच्या आईच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ११०/२०२४ भा द वि क ३२४,३२३, ५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.













