- चक्क कामगाराकडून भर मिटिंगमध्ये दोघांवर खुनीहल्ला….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२४) :- कंपनीच्या क्वालिटी विभागात कामगारांची मिटींग चालु होती. त्यावेळी अचानक कामगाराने खिशातून चाकू काढला. ‘कल मुझे गालीया क्यु दी’ असे म्हणत चाकु घेवुन एकाच्या गालावर, डाव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून त्याला जखमी केले.
त्यावेळी फिर्यादी मध्ये पडले. आरोपीने त्याच चाकूने फिर्यादीच्या हनुवटीवर व दोन्ही हातावर वार करून त्यांना जखमी केले. आरोपीपासुन वाचण्यासाठी फिर्यादी पळत असताना त्याने फिर्यादीच्या पाठीवर देखिल चाकुने वार करुन त्यांना जखमी केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. गुरुवारी (दि. २१) रोजी सकाळी ८.०० च्या दरम्यान चाकण मधील महाळुंगे येथील सुप्रजित प्रायव्हेट लिमीटेड कंपनी येथे ही घटना घडली.
फिर्यादी सचिन गोरख चव्हाण (वय २० वर्ष, रा. महाळुंगे) यांनी आरोपी अजय अबधाशरन दोहरे (सध्या रा. डोंगरवस्ती, निघोजे; मुळगाव बहादुरपुर, ता. जि. दतिया, जिल्हा मध्यप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे पोलिसांनी १५८/२०२४ भा.द.वि.क. ३२६,५०४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.













