न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- मोक्का गुन्हयातील आरोपीला पोलिसांनी अग्नीशस्त्रासह जेरबंद केले आहे. कृष्णा ऊर्फ बॉक्सर बाळू पारघे असे अटक आरोपीचे नाव आहे.
एक्साईड बॅटरी कंपनी परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे १ धारदार हत्यार मिळून आले. अधिक तपास केला असता १ भारतीय बनावटीचे अग्नीशस्त्र व ३ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
आरोपी कृष्णा ऊर्फ बॉक्सर बाळू पारधे हा पिंपरी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद आहेत. आरोपी हा अत्यंत चलाख, निर्दयी व कुख्यात असल्याने तो पोलीसांना गुंगारा देवून पळून जाण्यात तरबेज आहे. पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळून जावू लागल्याने पोलिसांनी योग्य बळाचा वापर करुन त्यास ताब्यात घेतले आहे. यापुर्वीही पिंपरी पोलिसांनी त्याला गंभीर गुन्हयात जेरबंद केले होते. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.













