न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- तडीपारिचा आदेश झुगारून पोलिसांच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला. त्याने आपल्या कब्जात लोखंडी कोयता जवळ बाळगला. पोलिसांना याची माहिती मिळताच (दि. २३) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास सहारा चौक, इंद्रायणीनगर, भोसरी येथे कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
सुरज प्रदीप शिंदे (वय २६ वर्षे, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १४९/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. सन १९५१ चे कलम, १४२ ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा गवारी पुढील तपास करीत आहेत.