न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- जमिन मालकांसह वारसांची ११८ गुंठे जमिन ज्वाईट व्हेंचरव्दारे विकसन करण्यासाठी देतो, असे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखविले. शेतकरी आणि त्यांच्या वारसांना देण्यासाठी समजुतीच्या करारनाम्याव्दारे डिपॉझीट एकूण रक्कम रु. ५०,००,००० रुपये आरोपीने फिर्यादीकडून घेतले.
२.५ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीसुध्दा आरोपीने ती रक्कम शेतकऱ्यांसह त्यांच्या वारसांना दिली नाही. फिर्यादीशी जागा विकसन करण्यासाठी विकसन करार करुन न देता फिर्यादीचा विश्वासघात करुन फसणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी हिरेनकुमार बाबुभाई पटेल (वय ३८ वर्षे, व्यवसाय बांधकाम) यांनी आरोपी संदिप शिवाजी भोंडवे (रा. भोंडवे वस्ती, रावेत) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी १३२/२०२४ भा.द.वि कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चाटे पुढील तपास करीत आहेत.