न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- इस्कॉन श्री गोविंद धाम रावेत मंदिरामध्ये मंदिराचा तेरावा वर्धापन दिन आज साजरा होणार आहे. बुधवारी (दि. २७) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
कार्यक्रमामध्ये भजन, कीर्तन श्री राधा कृष्णांचा अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे.
यंदाचं तेरावं वर्ष पूर्ण झालेला असून त्या निमित्ताने मंदिरात खूप सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. अनेक भाविक गेली दोन दिवस या उत्सवासाठी मन लावून सेवा करत आहेत. सकाळपासूनच भगवंतांचा शृंगार दिवसभर दर्शन भक्तांना मिळणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केल आहे.













