- मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचं भासवत महिलांना फसवलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- बनावट फोटोच्या आधारे महिलेकडुन खंडणी उकळणाऱ्याला निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३४ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. सय्यदनगर, हडपसर परिसरात सापळा रचून (दि. २३) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सुरज लक्ष्मण परमार उर्फ सुरज जैन उर्फ सुरेश मिवशी कदम उर्फ द्रीश मालपाणी (वय-२८ वर्षे रा. सय्यदनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मध्यमवयीन महिलेला आरोपीने सुरज याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन तीला तो एका मोठ्या उद्योगपती घराण्यातील मुलगा असल्याचे भासवले होते. तीच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करुन बाहेर भेटण्यास बोलावुन एकत्र फोटो काढून ते फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ केले. फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तीचेकडून वारंवार असे एकुण ३४ तोळे सोन्याचे दागिने घेतले. महिलेने पुन्हा आणखी दागीने देण्यास नकार दिला असता, त्याने फेसबुक आयडी स्वतःच्या मोबाईल मध्ये चालु करुन त्यावरुन सदरचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले होते. त्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान त्याने त्याच्या मैत्रीणीच्या नावाने विक्री केलेले फिर्यादी यांचे ३४ तोळे सोन्याचे दागिने, महिलेचे मॉर्फ केलेले फोटो हस्तगत करण्यात आले आहेत. तपासात त्याने अशाच प्रकारे अनेक महिलांना फसवीले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असुन त्याने यापूर्वी द्रिश मालपाणी या नावाने तो संगमनेर येथील मालपाणी कुटुंबातील सदस्य असल्याचे भासवुन नवि मुंबई येथील एका महिलेची ९३ लाखाची फसवणुक केल्याने त्याबाबत तुर्भे पोलीस ठाणे नवि मुंबई येथे २०२२ मध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला दत्तक घेणाऱ्या सोलापुर येथील एका महिलेचा छळ करून तीला आत्महत्येस प्रवृत केलेबद्दल स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर येथे सन २०१९ साली गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीने फेसबुक, इंस्टाग्राम व इतर समाजमाध्यमाद्वारे अनेक महिलांची फसवणुक केली असल्याची शक्यता असल्याने याद्वारे सदर महिलांनी निगडी पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे अवाहन करण्यात येत आहे. (महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल)

















