न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड पोलीसांनी संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जगताप टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई ” केली आहे.
सन २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०८ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ३९ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
भोसरी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६८/२०२४, भादंवि. ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४(२५), महा.पो.कायदा कलम ३७ (१)१३५ सह, क्रि.लॉ. अॅसे. अॅक्ट कलम ३ व ७. या गुन्हयांचे तपासामध्ये आरोपी नामे १) आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे रा. युवराज हॉटेलचे मागे, आदर्श नगर, मोशी पुणे २) सुनिल राणोजी जावळे वय २६ वर्ष रा रा. युवराज हॉटेलचे मागे, आदर्श नगर, मोशी पुणे ३) रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे वय १९ वर्षे रा. आळंदी रोड, माई वडेवाले हॉटेलचे मागे, सागर कॅफे दुकानाचे जवळ, भोसरी, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १३ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
वरील टोळी प्रमुख याने त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवून टोळी प्रमुख व साथीदार यांनी भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येका गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुच्च महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाचत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधीनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) वा कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.