न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- घराजवळ असलेल्या विहिरीजवळ सोमवारी (दि. १) सायंकाळी सहाच्या सुमारास तीन ते चार मुलं खेळत होती. त्यापैकी, काही मुलांनी खेळत असताना यातील वसीमला थेट विहिरीत ढकलून दिले.
त्यानंतर तो विहिरीत पडला असल्याची माहिती इतर मुलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. मग, कुटुंबीयांनी चिखली पोलिसांना माहिती दिली. चिखली पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीतून वसीमला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र, या घटनेत चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे यासह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. वसीम नाज्जीमुद्दीन खान असं तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे.

















