- बियरच्या बाटल्या एकमेकांच्या दिशेने मारुन फेकल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- होळी सणानिमित्त आयोजीत ‘रंग बरसे’ या इव्हेंटमध्ये फिर्यादीसह त्यांची मुलगी व मैत्रीणी गेल्या होत्या. या कार्यक्रमात दोन गटामध्ये मारामारी झाली. त्यापैकी अनोळखी दोन ते तीन इसमांनी बियरच्या बाटल्या एकमेकांच्या दिशेने मारुन फेकल्या. त्यापैकी काही बाटल्या फुटुन फिर्यादीच्या यांच्या मुलीच्या डाव्या व उजव्या पायाला लागुन गंभीर दुखापत झाली आहे.
कार्यक्रम आयोजित करणारे ‘रंग बरसे’ या इव्हेंटच्या आयोजकांनी कार्यक्रमाकरीता येणा-या महिला व लहान मुलांच्या सुरक्षीततेची कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. तसेच या कार्यक्रमात दारु विक्री व दारु पिण्यास दिली जाणार नाही, असे फिर्यादीला सांगण्यात आले असताना तेथे लोकांना पिण्यासाठी दारु व बियर देण्यात आली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २५/०३/२०२४) रोजी दुपारी ४.३० ते ५.०० च्या दरम्यान वुई हॉटेल, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी ‘रंग बरसे’ या इव्हेंटचे आयोजक, दोन गटात मारामारी करणारे अनोळखी दोन-तीन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी १४८/२०२४ भा. द. वि. कलम ३३७, ३३८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मणेर तपास करीत आहेत.