न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- भोसरीतील जय गोगा ऑटोमोबाईल कंपनी आणि मनोज अॅटो स्पार्ट या ऑटोमोबाईल दुकानात दोघांनी टी.व्ही.एस. मोटर्स कं.लि. या कंपनीचा ५१,८११ रु, किं. चा नक्कल केलेला बनावट माल विक्रीसाठी ठेवला. स्वामीत्वाचा अधिकार दिलेल्या टि.व्ही.एस मोटर्स कंपनीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ०२) रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास निदर्शनास आला. या प्रकरणी फिर्यादी पियुश यशवंत राऊत (डीव्हीजन ऑफिसर) यांनी आरोपी १. जयेश उकमलजी जैन, मनोज खिमजी पलान यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी २१७/२०२४ भादवि कलम ४२० व प्रतीलिपी अधिनियम कलम ५१, ६३ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जोनापल्ले पुढील तपास करीत आहेत.