न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- उपअधीक्षक भूमी अभिलेख खेड, राजगुरुनगर कार्यालय येथे तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी खेड (पुणे) यांच्या कार्यालयात परिक्षण भुमापक म्हणून फिर्यादी कार्यरत आहेत. (दि. २) रोजी तालुका कार्यकारी दंडाधिकारी खेड (पुणे) यांचे कार्यालय यांचे जा क्र. वतन/कावि/५३८/२०२३ राजगुरूनगर, दि. २०/११/२०२३ अन्वये प्रस्तुत दरखास्त प्रकरणाबाबत मा. दिवाणी न्यायालय खेड वरिश्ठ स्तर यांचेकडील ६३/२००४-०८/२०१६ अन्वये दिलेल्या हकमनामा आदेशाप्रमाणे जमीन गट नं. ४१५ साबळेवाडी, जमीन गट क्र. १७४,१७६,१७७,१८२ सिध्देगव्हाण या जमिनीची शासकीय मोजणी करीत होते.
दरम्यान आरोपी १ ते ११ हे फिर्यादीस ”आम्ही मोजणी करु देणार नाही, तुमचा काही एक संबंध नाही. तुम्ही येथून निघून जा”, असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगत असताना आरोपी १ ते ११ यांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून फिर्यादी यांचे शर्टाचे कॉलर पकडून धक्काबुक्की करु लागले. व फिर्यादी यांचे सोबत असलेला मदतणीस विठ्ठल गावंडे याचे हातातील जिपीएस मशीन ही ओढून घेवून ढकलून दिले. तसेच दगडाने ठेचून मारून टाकू, तुम्हाला तुमच्या आईनेच जन्म दिला का?, तुम्ही सगळे मादरचोद आहात, असे म्हणून धक्काबुक्की करु लागले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपी ५ ते ७ यांनी स्वत: प्लॅस्टीकच्या बॉटलमध्ये पेट्रोल किंवा डिझेल सारखा दिसणारा ज्वलनशिल पदार्थ मागवून घेतला. धमकी देत त्यांनी त्यांच्या स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. त्यावेळी पेट्रोल व डिझेलसारखा वास येत होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला माचीसने पेटवून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ०२) रोजी ११.३० च्या सुमारास साबळेवाडी, जमिन गट नं ४१५ मध्ये घडली.
फिर्यादी धनंजय अषोक ठाणेकर (वय ४१ वर्षे, परिरक्षण भूमापक) यांनी आरोपी १) गणेष बाळासाहेब साबळे, २) नामदेव बबन साबळे ३) चांगदेव बबन साबळे, ४) संदीप नामदेव साबळे, ५) तीन महिला आरोपी ८) भरत भाउसाहेब साबळे, ९) बाळराजे चांगदेव साबळे, १०) महिला आरोपी, ११) बापू चांगदेव
साबळे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चाकण पोलीस ठाण्यात २२०/२०२४ भादवि ३३२,३५३,१४३,३४७,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटकेत आहेत. पोउपनि सुकाळे तपास करीत आहेत.