- बाणेरमधील धक्कादायक प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- मुंबई कस्टम ऑफिसने फिर्यादीच्या आधारकार्डच्या नावावर बनावट ५ पासपोर्ट, ३ बँक क्रेडिट कार्ड, ४ किलो कपडे, १ लॅपटॉप, ३५ हजार भारतीय रुपये व २०० ग्रॅम एम.डी.एम.ए ड्रग्ज पकडले आहे. आम्हाला तुमची चौकशी करायची आहे, असे खोटे सांगुन फिर्यादीला बळजबरीने स्काईप अँप डाऊनलोड करायला लावले. त्यांचे स्काईप अँप आयडी नंबर live:.cid.c941dfd0219bb105 व live:.cid. d51ab9 6b80bb 2ff70 यावरुन फिर्यादीला आरोपी रवी चंद्र नावाचे इसमाने पोलीस असल्याची बतावणी केली.
फिर्यादीस व्हिडीओ कॉल करुन पोलीस डिपार्टमेंट तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवुन तुमची फायनानशियल कंडीशन चेक करणार आहे. तुम्हाला जर कोणाचा कॉल आला तर स्पीकर ऑन करुन बोलायचे, अशी बळजबरी केली. फिर्यादीस कन्टीन्यु व्हिडीओ कॉलवर थांबण्यास सांगुन फिर्यादीकडुन फिर्यादीचे लाईव्ह लोकेशन स्काईप अँप मागवुन घेवुन फिर्यादीचे हालचालीवर बंधन आणुन फिर्यादीस घरात बंधक बनवुन ७,९६,४२५ रुपये आरटीजीएस करायला सांगितले. फिर्यादीची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०१/०४/२०२४ ते दिनांक ०२/०४/२०२४) रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान राहत्या घरी बाणेर येथे घडला. फिर्यादी हर्ष संजय धिमण (वय ३१ वर्षे) यांनी १) मोबाईल नंबर ८१२७३२५८१० वरील इसम नामे मनोज अगरवाल, २) स्काईप अँप आयडी नंबर live:.cid.c941dfd0219bb105 व live:.cid.d51ab96b80bb2ff70 वरील इसम नामे रवीचंद्र यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ४३७/२०२४. भा.द.वि. कलम. ४२०,३४२,५०६,१७० आयटी अॅक्ट कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राकेश सरडे पोलीस उप निरीक्षक हे तपास करीत आहेत.