न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार चार चाकी वाहनास काळी काच लावणाऱ्या वाहन चालकां विरोधात (दि. २९/०३/२०२४ ते ०४/०४/२०२४) दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली.
चारचाकी वाहनांस काळी काच (टेन्टेड ग्लास) लावलेल्या एकुण ३,४३५ वाहनांवर वाहतुक विभागांमार्फत कारवाई करण्यात आली. एकुण ३७,९१,५०० रुपये एवढा दंड आकारण्यात आलेला आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे वेगवगळ्या हेडखाली वाहतुक शाखेमार्फत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.
नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडुन करण्यात आले आहे.











