न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश पद्धत राबविण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत राखीव आरटीई प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून एक किमीपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वय अर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील.
अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वय अर्थसहाव्यीत शाळा नसेल तर विद्याथ्यांच्या निवासस्थानापासून तीन किमीपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश प्राधान्यक्रमाने होतील. आरटीईतून अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.