न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- पिंपरी विधानसभेतील कार्यकर्ते व पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरखे यांच्या वतीने नुकतेच संपर्क अभियान निगडीते दापोडीपर्यंत राबविण्यात आले. पंतप्रधान मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यास कुठल्या प्रकारच्या केंद्रीय योजना पिंपरी विधानसभेत हव्या आहेत? याची विचारणा नागरिकांकडे करण्यात आली.
नागरिकांकडून या सूचना लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या. त्या सुचनांची पेटी (बॉक्स) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, मा. आ. बाळा भेगडे, मा. आमदार प्रशांत ठाकुर, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, अनुप मोरे, बाळासाहेब पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.













