न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- फिर्यादीचे पती आणि आरोपी हे दोघं एकमेकांचे मित्र होते. मित्राला व्यवसायाकरीता फिर्यादीच्या पतीने लोकांकडुन उसने व व्याजाने पैसे घेवुन दिले होते. परंतु त्याने दिलेले पैसे लोकांना परत दिले नाहीत.
लोकं हे पैशा करीता फिर्यादीच्या पतीकडे तगादा लावत होते. फिर्यादीचे पती व आरोपी यांच्यात पैशावरुन भांडण होत होते. त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे त्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळुन फिर्यादीचे पती दौलतराम वाघ यांनी घरामध्ये दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०५) रोजी ०९.३० च्या सुमारास त्रिशक्ती कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी येथे राहत्या घरामध्ये घडली. याप्रकरणी महिलेने आरोपी संदिप भिकचंद बागमार (वय ४५, दगडु पाटील नगर, थेरगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४४४/२०२४ भा.दं.वि कलम ३०६ प्रमाणे आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोउपनि सुर्यवंशी तपास करीत आहेत.