न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- रमजान ईद या मुस्लिमांच्या पवित्र सणानिमित्त चापेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामुळे गुरूवारी (दि. ११) पहाटे पाच ते दुपारी बारा या कालावधीत ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी आदेश दिले आहेत.
वाहतूक वळवलेले मार्ग :- मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक एस के एफ कंपनीकडून डाव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक चापेकर चौक जुना जकात नाका कडून उजव्या बाजूला वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जाईल अथवा चापेकर चौकातून उजव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
बिजलीनगर, हनुमान मंदिर वेताळ नगर ते चापेकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक हनुमान मंदिर येथून डावीकडे वळून मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल कडून इच्छित स्थळी जाईल.













