- व्यवसायिकांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- थेरगांव येथील रहिवासी सदनिका प्रकल्पामधील फ्लॅट नं. ३०१ आणि चोविसावाडी येथील नविन बांधकाम प्रकल्प फॉर्च्यून हिल टॉप यामधील शॉप नं. २ व फ्लॅट नं. २०९, २०८, २०७ तसेच फॉर्च्यून वेदास या प्रकल्पामधील २ दुकाने व ७ सदनिका खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादीस भाग पाडले.
पैसे गुंतवणूक करण्यास सांगुन प्रकल्पातील सदनिका व शॉप यांचा ताबा फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये झालेल्या कारनाम्याप्रमाणे फिर्यादी यांना देण बंधनकारक होतं. तरी देखील आरोपी यांनी ताबा न देता फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन ३ कोटी २५ लाख ०६ हजार ५८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी फिर्यादी हनुमंत माधव दरेकर (वय ५५ वर्षे) यांनी आरोपी १) नितीन शंकर धिमधिमे (वय ४४ वर्षे, व्यवसाय-बिझनेस), २) मकरंद सुधीर पांडे (वय ४६ वर्षे, व्यवसाय-बिझनेस) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी १७२/२०२४ भा.दं.वि कलम ४०६,४२०, ४६५,४६७, ४६८,४७१, १२०(ब) प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भामरे तपास करीत आहेत.