- खंडणी विरोधी पथकाकडून दोघांना मुद्देमालासह अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- कंपनीत दोघांनी आपसांत संगनमत करुन जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमीटेड, महाळुंगे येथून आरोपी क्रं २ याच्या ताब्यातील वाहनात (एम.एच. १४/जे.एल. ५०८४) कंपनी चलनाप्रमाणे एकुण ७२१ किलोग्रॅम दुचाकी व चारचाकी वाहनांचा रबर पार्ट (होजेस) ७३,२४२ रु. किं.चा माल भरला. त्यामध्ये वेगवेगळया प्रकारचे पार्ट होते. कंपनीचा विश्वासघात करुन त्या मालाचा अपहार केला.
तसेच दिलेल्या इनवाईस व्यतीरीक्त जास्तीचा कच्चा माल एकुण ६३० किलोग्रॅम दुचाकी व चारचाकी वाहनांचे रबर पार्ट (होजेस) त्यामध्ये वेगवेगळया प्रकारचे पार्ट हे किं रु १,०८,०००/- असे एकुण १,८१,२४२/- रु किं चा माल गाडीत भरुन घेवुन तो सिक्युरीटी चेक करत असताना तो चुकवुन कंपनीबाहेर काढुन चोरी केला होता.
हा प्रकार (दि.०८) रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी फिर्यादी अतुल सुभाष पिंगळे (वय ४५ वर्ष, प्लॅट मॅनेजर) यांनी आरोपी १) सनी महादेव भिवरकर, २) शफीक यासीन पठाण (वय-४९ वर्षे, रा. मु.पो. निंबगाव खंडोबा; सध्या रा. वडगाव फाटयाचे जवळ, व्हिवव्हिला, वडगाव मावळ) यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात २२६/२०२४ भा.द.वि. कलम ३८१,४०८,३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल होता. पोउपनि थेउरकर तपास करीत होते.
दरम्यान पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने कंपनीतून चोरलेल्या इंम्पोर्टेड रबर पार्टची चोरी करणाऱ्या दोघा आरोपीना ६,७५,००० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांना महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.