न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- महापालिकेच्या सेक्टर ११, १३ स्पाईन रस्त्यावरील जलवाहिनीला अचानक गळती लागली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने चऱ्होली, मोशी, डूडूळ गाव, बोऱ्हाडेवाडीसह या वाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नसून शुक्रवारचा विस्कळीत राहणार आहे.
या जलवाहिनीवरून होणारा चऱ्होली, मोशी, डूडूळ गाव, बोऱ्हाडे वाडी, चोवीसवाडी, वडमुखवाडी, देहू रस्ता,चक्रपाणी वसाहत, इंद्रायणी नगर, सर्व प्राधिकरण सेक्टर क्रमांक ४,६,९,११, १३ तसेच चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर या सर्व भागाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा चालू करण्यात येईल.
तसेच उद्याचा पाणीपुरवठा हा अनियमित, कमी वेळ, कमी दाबाने आणि विस्कळीत राहील असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. गळती लवकरात लवकर काढून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांनी केले.