न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- शस्त्र असल्याची भिती दाखवून फिर्यादीकडे १०,००० रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांना कोयत्याने आतडे बाहेर काढू का? अशी धमकी दिली. ‘तु माझा साथीदार दिपक मोहिते याचेवर गुन्हा दाखल केला, काय झाले त्याचे? मी त्याचा नंबरकारी आहे. तु माझी तक्रार दिल्यास मी जेलमधून बाहेर आल्यावर तुला मारुन टाकीन?, अशी धमकी दिली. त्याबाबत फिर्यादीने कोठेही तक्रार दिली नाही.
दरम्यान त्यानंतर आरोपी याने पुन्हा रात्री १०.४० च्या सुमारास साथीदारांसह येवून फिर्यादीस उद्देशून जिवे मारण्याची धमकी दिली, असं फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २८/०२/२०२४) रोजी रात्री १०.४० वा. राजमाता जिजाऊ सांस्कृतीक भवन व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल रस्त्यावर घडली.
फिर्यादी प्रज्वल ऊर्फ राहुल कमलेश दुबे (वय ३० वर्षे, धंदा वकिली व प्राणीमित्र) यांनी आरोपी शुभम कांबळे (रा. संत तुकारामनगर पिंपरी) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ३५६/२०२४ भा.दं.वि कलम ३८५, ३८७, ५०६, ५०४, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि माने पुढील तपास करीत आहेत.