न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- पाच जनांनी संगनमत करीत बेकायदेशीररित्या फिर्यादीचे पती यांना गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) पुणे यांच्याकडुन मिळालेलं निवासी घर अर्धा गुंठा मिळकत मुलीच्या नावे करण्यासाठी खोटे व बनावट नोटरी इच्छापत्र बनविले.
त्यावर फिर्यादीची व पतीची खोटी स्वाक्षरी करुन ते म्हाडा कार्यालय, पुणे येथे जमा केले. तसेच फिर्यादीचे व पतीचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे. हा प्रकार (दि.२७/०१/२००३ ते आजपर्यत) संत तुकारामनगर, पिंपरी येथिल निवासी घर येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी १) अविराज चिंतामण वैराट, २) महिला (वय ४२ वर्ष), ३) रघुनाथ शंकर पोटोळे, ४) सागर काशिनाथ भिसे, ५) सतीशकुमार तिवारी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ३५८/२०२४ भादंवि कलम ४२०,४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पांडे तपास करीत आहेत.














