- पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा बिजलीनगरमध्ये छापा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- परवाना नसताना घरगुती भरलेल्या गॅस सिलेंडरमधुन रिफीलच्या सहाय्याने घरगुती वापराचा गॅस अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता इतर छोटया सिलेंडरमध्ये गॅस काढुन घेतला. त्यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असुनसुध्दा आरोपी यांनी मानवी जिवीतास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त केलेला नव्हता.
ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा इतका बंदोबस्त करण्याचे जाणीवपुर्वक टाळुन घरगुती भरलेल्या सिलेंडरमधुन इतर छोटया सिलेंडरमध्ये गॅस काढुन घेत असताना पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांच्या निदर्शनास आला. एकुण ३,२०,११० रुपये किंमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये एकुण २९ घरगुती वापराचे, ०३ व्यावसाईक वापराचे गॅस सिलेंडर व ७२ लहान गॅस सिलेंडर, गॅस रिफिल करण्याचे साहित्य व वाहतुकीकरीता वापरण्यात येणारा टेंपो असा मुद्देमाल मिळुन आला.
आरोपी मुकेश सुरेश पवार (वय २४ वर्षे, मल्हार गॅस सर्विस व होम अप्लायंसेस नावाचे दुकान, रा. तुळजाभवानी मंदिराचे बाजुला, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी १७३ /२०२४ भा.दं.वि कलम-२८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोनि जाधव तपास करीत आहेत.