न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- अनोळखी सिम धारकांनी फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर वारंवार व्हीडिओ कॉल, कॉल, व्हॉट्टसअप मेसेज, टेक्स्ट मेसज केला. त्याद्वारे त्यांचा पाठलाग करून फिर्यादीकडील सर्व मोबाईल क्रमांक सेक्स साईटवर अपलोड करतो, अशी त्यांना धमकी दिली आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
हा प्रकार (दि ०९) रोजी रात्री ११.३२ ते (दि. ११) रोजी दुपारी २.३२ च्या दरम्यान बावधन येथे घडला. महीला फिर्यादी (डॉक्टर) यांनी आरोपी १) ७३०४३०२४१३, २) ८६५२५९९५३४ वरील अनोळखी मोबाईल धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ४७५/२०२४ भादवि कलम ३५४ ४,५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शेळके हे पुढील तपास करीत आहेत.