- ६ गुन्हे उघडकीस; चिखली पोलीसांची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२४) :- चैनी खातर मोटरसायकली चोरणा-या अल्पवयीन मुलाकडून सात चोरीच्या मोटरसायकली जप्त करीत ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी चिखली पोलीसांनी केली आहे.
चिखलीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठ्या लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग असुन सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग भाडयाने राहण्यास आहे. कामगार कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलचा वापर करीत असतात. ब-याचशा भागामध्ये रात्रीच्या वेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग उपलब्ध नसल्याने ते त्यांच्या मोटारसायकली राहत्या घराच्या समोरील रस्त्याच्या कडेला पार्क करीत असतात.
मागील काही दिवसांपासुन चिखली परिसरातुन मोटारसायकली चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली असुन मोटारसायकल चोरी करणा-या गुन्हेगारांचा शोध घेणे हे चिखली पोलीसांसमोरील एक आव्हान होते.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीतुन होणा-या मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याचे दृष्टीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक उद्धव खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष वाहन चोरी पथक निर्माण करुन त्याना मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. या पथकाने चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील घडलेल्या गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील सिसिटिव्ही फुटेज मिळवुन त्यानुसार चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी ट्रॅप लावुन तसेच पेट्रोलिंग करुन वाहन चोरी करणा-या आरोपींना पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले.
दिनांक १२/०४/२०२४ चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नमुद पथक हे चिंचेचा मळा, मोरे वस्ती, चिखली परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तिन मुले एकाच मोटर सायकलवरुन परिसरामध्ये संशयीतरित्या फिरत असताना दिसुन आली. पोलीसांना पाहुन ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स.पो.नि. खाडे व त्यांचे पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यांना अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली, पुणे. येथे ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यात मिळुन आलेली हिरो होन्डा पेंशन प्रो मोटारसायकल नंबर MH-04-EK-0886 बाबत खात्री केली असता त्याबाबत चिखली पोलीस ठाणे मध्ये गु. रजि. नंबर. १९४/२०२४ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली. मुले अल्पवयीन वाटत असल्याने त्याच्या पालकांना बोलावुन घेवुन पालकांसमक्ष अल्पवयीन मुलांकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी आणखी सहा मोटारसायकलची चोरी केली असल्याचे सांगुन त्या कुदळवाडी सर्कल ब्रिज च्या खाली असलेल्या स्पाईनरोड मधील मोकळ्या जागेमध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे त्यांचे पालकांसोबत त्यांना घेवुन कुदळवाडी ब्रिजचे खाली, स्पाईन रोडच्या मधील जागेमध्ये गेलो असता तेथे १) होन्डा ड्रिम निओ मोटर सायकल नंबर MH-14-EL-9612 २) होन्डा युनिकॉन मोटर सायकल MH-12-JY-8201 ३) सुझुकी बर्गमन स्कुटर नंबर MH-04-LA-4920 ४) पल्सर मोटर सायकल नंबर MH-14-EX-2280 ५) हिरो स्प्लेंडर मोटारसायकल नंबर MH-14-JY-3772, 6) ΜΗ-14-EA-4409 अशा सहा मोटारसायकली मिळुन आल्या. ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलींबाबत खात्री केली असता त्याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर १९४/२०२४, भादवी कलम ३७९ २) चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर २०८/२०२४, भादवी कलम ३७९
३) चिखली पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर १४०/२०२३, भादवी कलम ३७९
) डायघरपोलीस ठाणे, ठाणे शहर कडील गुन्हा क्र.४५०/२०२४ भादंवि कलम ३७९ ४
५) चिखली पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर ३९६/२०२३, भादवी कलम ३७९
६) चिखली पो.ठाणे गु.र.क्र. ८४/२०२४ क. ३७९ भा.द.वी.
उर्वरीत पल्सर मोटर सायकल नंबर. MH-14-EX-2280 या मोटारसायकल बाबत ते चोरल्याची कबुली देतात परंतू कोणतिही खात्रीदायक माहिती प्राप्त न झाल्याने त्याबाचत तपास चालु आहे. अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून चिखली पोलीसांनी सात मोटारसायकल जप्त केलेल्या असुन सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संदीप हिरे, सहा. पोलीस आयुक्त, एम आय डी. सि. भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि/श्री उध्दव खाडे, पोहवा / सुनिल शिंदे, पोहवा/बाबा गर्जे, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा/संदिप मासाळ, पोहवा / दिपक मोहिते, पोहवा/अमोल साकोरे, पोना/अमर कांबळे, पोना / कबीर पिंजारी, पोना/संदीप राठोड पोशि / संतोष सकपाळ, पोशि/संतोष भोर, पोशि/सातपुते यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.