न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- आईसाठी गुडघे दुखीच्या गोळ्या आणण्यासाठी फिर्यादी त्यांच्या मित्रासह मेडिकल दुकानात गेले होते. तिथे आरोपी क्रं १ याची गाडी फिर्यादीच्या पायावरून गेली. त्या कारणावरुन वाद होवुन आरोपी यांनी बेकायदेशिर जमाव जमवत फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्यांनी, रॉडसारखे हत्यार व लाकडी बॅटने उजव्या डोळ्याला, डोक्याला, हाताला, कोप-याला, पोटाला, पाठीवर, पार्श्वभागावर, पायावर मारुन त्यांना जखमी केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २०) रात्री ०१.०० च्या सुमारास वेलनेस मेडिकल, शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे घडला. फिर्यादी सिध्दार्थ सुनिल चाबुकस्वार (वय २३ वर्षे) यांनी आरोपी १) आकाश सुनिल कोळी, २) अभिषेक प्रकाश श्रीमंगले, ३) आनंद सिताराम यादव ४) भावेश सुरेश पाटील ५) सुमित पोपट भोसले, ६) अतिश सावंत व इतर ४ आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ४९५/२०२४ भा.दं. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,१४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बालाजी मेटे, पोलीस उपनिरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत.