न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात दहशत माजविणारे व हातभट्टी दारु तयार करुन विकणाऱ्या कुप्रसिध्द गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी ‘एम.पी.डी.ए.’ कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
आगामी लोकसभा २०२४ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुक या भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहशत माजवून गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर परिणामकारक व कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस स्टेशन स्थरावर कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
१) पिंपरी पोलीस स्टेशन यांनी अभिलेख तपासून पहाता पिंपरी, हिंजवडी, वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सलमान रमजान शेख (वय २८ वर्षे रा.साई अच्दा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोयतासारख्या जीवघेणी हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, चोरी व बेकायदेशिररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे ०९ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यांचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे पिंपरी पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला.
२) चाकण पोलीस स्टेशन यांनी अभिलेख तपासून पहाता चाकण पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सतिश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार (वय २१ वर्षे, रा. खंडोबामाळ, आंबेडकरनगर, चाकण) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह गंभीर दुखापत, खंडणी गोळा करणे, यासारखे ०३ गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यांचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे चाकण पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला.
३) हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी अभिलेख तपासून पहाता हिजवडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार शुभम रुपसिंग भाट (वय-२६ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगांव) याने गावठी हातभट्टी तयार करणे, विक्री करणे करीता जवळ बाळगणे अशा प्रकारचे ०६ गुन्हे केलेले आहेत. त्यांचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे हिंजवडी पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाला.
या तीनही प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा पूणे येथे स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेले आहेत. एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबद्धतेच्या २०२४ मध्ये एकूण ७ कारवाया करण्यात आलेल्या असून यापुढे ही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांनी दिली आहे.