न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- वाकड पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि त्यांचे सहकारी पो. हवा. हे चाकू हल्ला झालेल्या जखमी इसमाच्या मदतीला गेले होते. त्यावेळी चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला ‘तु पोलीस स्टेशनला चल’ असे म्हटले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ करीत तेथून पळून जावू लागला.
त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान आरोपीने पोलीस अंमलदाराच्या डाव्या हाताला जोराने चावा घेवून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या मदतीला आलेल्या काळेवाडी मार्शलचे अंमलदार यांना उजव्या दंडाला जोरात चावा घेवून जखमी करुन सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला.
हा प्रकार (दि. २२) रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास समता कॉलनी, धनगरबाबा मंदीरामागे, थेरगांव येथे घडला. आरोपी सुरज चंद्रकांत कु-हाडे (वय २२ वर्षे) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात ५१२/२०२४, भा. द. वि. कलम ३५३,३३२, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अंमलदार सपोनि नलावडे तपास करीत आहेत