- ६५ वर्षीय शेतकरी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२४) :- शेतामध्ये ओलसर हिरवट रंगाच्या मक्याच्या पिकामध्ये उग्र वास येत असलेली गांजाची बोंडे निदर्शनास आली. गांजा या अंमली पदार्थाची सुमारे पाच ते दहा फुट उंचीची छोटी मोठी एकुण ६६ झाडे होती. त्याचे एकुण २३ किलो वजन असून ११,५०,००० रुपये किंमत आहे.
गांजा या अंमली पदार्थाची झाडे आरोपीने बेकायदेशिररित्या शेतामध्ये लावली. हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास चाकण गावच्य हद्दीत आगरवाडी रोडलगत जमीन गट नं. २७९ मध्ये निदर्शनास आला.
सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५ वर्षे, धंदा शेती रा. आगरवाडी रोड, चाकण) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात २७४/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (ब), २० (अ), २० (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सपोनि ज-हाड तपास करीत आहेत.