न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- हनुमान जन्मोत्सवानिमित्त बिजलीनगर येथे मंगळवारी (दि. २३) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मित्र मंडळ आणि एमएसईबी बिजलीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
उपस्थित भक्तांनी तसेच तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले अमुल्य असे रक्तदान केले. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य पथकाच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष अनिल जोशी, अभियंते नितीन धात्रक, प्रशांत पाटील, नंदकुमार ढाकणे, पुष्पक चौधरी, विनायक सरोदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष सौदणकर, भूषण पाटिल, वितरणचे सोमनाथ मुंडे, दिवाकर देशमुख, कल्याण गिरी, सामाजिक कार्यकर्त किशोर चोमे आदींचा सहभाग लाभला.