न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२४) :- राहत्या घरासमोरील ओट्यावर टु व्हीलर स्टँडला लावून त्यावर बसून फिर्यादी २७ वर्षीय तरुण मोबाईलवर गेम खेळत होता. दरम्यान आरोपी नं १ याने फिर्यादी तरुणासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरुन व फिर्यादी हा धिरज ठाकुर यांच्या सोबत असतो याचा राग मनात धरुन त्याच्या दोन साथीदारांसह मिळून फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी तरुणाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तिन राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी ही फिर्यादीच्या डाव्या खांद्याला लागून गेली. त्यामुळे फिर्यादी तरुण जखमी झाला आहे. हा प्रकार (दि. २३) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास शितळादेवी मंदीराजवळ, भेगडे आळी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे घडला.
फिर्यादी आदित्य गणेश भेगडे (वय २७ वर्षे) याने आरोपी १) ध्रुव रमेश खिलारे (रा. मंत्रा सिटी तळेगाव दाभाडे), २) त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २५६/२०२४ भा.द.वि. कलम ३०७, ५०६ (२), ३४, आर्म अॅक्ट ३ (२५) २७, ३५ सह. महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पो. नि. रायन्नावर तपास करीत आहेत.