न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२४) :- दोघांनी मेफेड्रॉन (एम.डी.) हा २५.४० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ व दोन मोबाईल बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगले. ज्याची किमत एकुण २,७३,००० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट ५ ने (दि. २७) रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर, तळेगाव उर्से रोडवर, रस्त्याचे कडेला तळेगाव दाभाडे येथे कारवाई केली.
१) जनार्दन दगडु पवार (वय ३४ वर्षे, रा माळीनगर, वडगाव मावळ), २) शशीकांत बाळासाहेब मराठे (वय २५ वर्षे, रा वराळे) यांना ताब्यात घेतले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी २६०/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) व २९, कलम प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शिंपने तपास करीत आहेत.