न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२४) :- पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून दोन वर्षे (२४ महिने) मुदतीसाठी रेकोर्डवरील सराईत गुन्हेगार तरुणाला हद्दपार केले आहे. असे असताना त्या तडीपार तरुणाने आदेशाचा भंग करून तसेच कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आदेशाचा भंग केला.
जवळ ४०,००० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्टल व ४००० रु की चे ४ जिवंत काडतुस बाळगले. याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा, युनिट १ ने कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर चिखली २४७/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) चा भंग कलम १३५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार उर्फ तुसल्या गौतम झेंडे (वय २६ वर्षे रा. उरवेला हौ. सोसा.बि.नं.०५, रुम नं.०८, ओटास्कीम, निगडी) असं अटक आरोपीचे नाव आहे. पोउपनि कानडे पुढील तपास करीत आहेत.